महिमानगड विषयी माहिती
महिमानगड किल्ला:
दहिवडी-सातारा सातारा मार्गावर दहिवडी पासून पश्चिमेस १२ कि.मी. अंतरावर एक डोंगरावर वसलेला हा किल्ला शिवाजी महाराजांनी पूर्वेकडील स्वराज्याच्या रक्षणाकरिता बांधला असे नमूद केले गेले आहे. या किल्ल्यावर महार व रामोशी जातीचे सैनिक शत्रूंच्या हालचालीवर पाळत ठेवण्याकरिता व रक्षणाकरिता ठेवले जात असत. किल्ल्यावर जाण्यासाठी दहिवडी-सातारा रस्त्यावर महिमानगड फाट्यावर उतरून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या महिमानगड गावात जाता येते, गावातून किल्ल्याकडी जाणाऱ्या पायवाटेणे डोंगर चढून २० टे २५ मिनिटांत किल्ल्यावर पोहचता येते. डोंगर चढून प्रेवेश द्वारातून प्रवेश करता पुढे बुरुज आणि हनुमानाचे मंदिर पहावयास मिळते. या किल्ल्यावर जुन्या वास्तू अस्तित्वात नसून वाड्याचे अवशेष इतरत्र नजरेस पडतात. किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज आजही बऱ्याच प्रमाणात सुस्थितीत आहे. गडावर असलेल्या तलावामध्ये बारमाही पाणी टिकते. किल्ल्यावर राहण्याची कोणतीही सोय नाही.
महिमानगड गाव:
महिमानगड किल्ल्याच्या पायथ्याला हे गाव वसले आहे, किल्ल्यामुळेच या गावाला महिमानगड असे नाव पडले आहे. या गावामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक आहेत. महिमानगड गावामध्ये जुन्या काळातील असंख्य वाडे पहावयास मिळतील..या वाड्यांची बांधणी, त्यामध्ये असलेली भुयारे हे त्यांचे खास वैशिष्ठय आहे...
महिमानगड मध्ये पूर्वी घोंगडी बनविण्याचा उद्योग चालत असे..आजही काही घरांमधून हा उद्योग पहावयास मिळतो....