संतोषगड विषयी माहिती
वर्धनगड, महिमानगड, वारुगड हे किल्ले असलेल्या डोंगर रांगेतील हा आणखी एक किल्ला. महाराष्ट्रातील आणखी एक दुर्लक्षित किल्ला म्हणावा अशीच याची अवस्था आहे. या किल्ल्यावरील जवळपास सर्व वास्तू नाहीश्या झाल्या आहेत. दुरवस्था झालेली असली तरी येथे आजून देखील पाहण्यासारखे बरेच काही आहे. किल्ल्यावरील तटबंदी व बुरुज अजून देखील भक्कम आहेत. काही पडक्या भिंती व पाण्याचे टाके देखील पहावयास मिळतात. या किल्ल्यावरून भोवतालच्या दूर पर्यंतच्या भागावर लक्ष ठेवता येऊ शकते. ताथवडे येथून किल्ल्यावर पोचण्यास सोपी वाट आहे. किल्ल्याची रचना संरक्षण भिंत माची व बालेकिल्ला अशी आहे. वाटेत एक मठ, देऊळ तसेच गुहा अश्या गोष्टी पहावयास मिळतात. हा किल्ला तितकासा माहित नसल्याने येथे पर्यटन विकसित नाही. येथे राहण्याची सोय होणे देखील कठीण आहे.