आपला कौल
माणदेशी म्हणून तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटतो का?

 
View Poll Results | 2442 मते
वारुगड किल्ला
अंतर:
दहिवडी-फलटण मार्गावरील बिजवडी या गावापासून १८ किमी
कसे जाल:
फलटण वरून मोगराळे-तोंडले मार्गे एकमेव बस उपलब्ध....स्वतःची गाडी असल्यास एकदम उत्तम
वारुगड किल्ला
वारुगड किल्ला विषयी माहिती
वारुगड किल्ला: शिवाजी महाराजांच्या दुर्गसंपत्ती मधील हा वारुगड किल्ला. दुरून लहान भासणार हा किल्ला जवळून पाहिल्यास त्याची भक्कम बांधकाम आणि भव्यता जाणवून येते. पठाराच्या मुख्य प्रेवेश द्वारातून प्रवेश करून टेकडीस वळसा घालून उत्तरेकडून किल्ल्याच्या प्रेवेशद्वाराकडे जाता येते. टेकडीच्या पायथ्यापासून वरच्या बाजूस जाऊन काही पायऱ्या पार केल्यानंतर डोंगर कपारीत कोरलेले प्रवेश द्वार दिसते. दरवाजाची तटबंदी आजूनही शाबूत आहे. बालेकिल्ल्यावर पोचल्यावर सदरेची इमारत दिसते ती आता नव्याने बांधली आहे. या किल्ल्याचा काही भाग आजून हि सुरक्षित आहे तर काही भागाची पडझड झालेली दिसून येते. या किल्ल्यावरून सभोवताली नजर टाकल्यास हा किल्ला किती मोक्याच्या जगही बांधला गेला आहे याची जाणीव होते. किल्ल्याच्या भोवताली अनेक अवशेष पाहण्यास मिळतात. किल्ल्याच्या पश्चिमेस एक आणि पत्राच्या उत्तरेकडील प्रेवश द्वाराच्या उजव्या बाजूस पाण्याचे टाके आजून हि सुरक्षित आहेत, यामध्ये वर्षभर पाण्याचा साठ टिकून राहतो. या किल्ल्याचे किल्लेदार प्रभू जातीचे होते आणि यामध्ये २०० पहारेकरी आणि शिबंद असली जायची असे बोलले जाते. १८१८ मध्ये हा किल्ला सातारच्या राजाचे फडणीस विठ्ठलपंत यांनी २०० लोक पाठवून बाजीरावांकडून घेतला अशी नोंद आहे.

 
 
© माणदेशी.कॉम सर्व हक्क सुरक्षित | स्वगृह | संपर्क करा | मत दया | मित्रांना सांगा
वेबसाईट बनविली आहे अमर ढेंबरे यांनी