आपला कौल
माणदेशी म्हणून तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटतो का?

 
View Poll Results | 3056 मते
औंध

अंतर: सातारा पासून ४८ किमी, वडूज पासून १९ किमी, दहिवडी पासून ३८ किमी

कसे जाल: औंध येथे जाण्यासाठी वडूज, दहिवडी, सातारा या ठिकाणांपासून पासून बसेस उपलब्ध.

औंध विषयी माहिती
श्री यमाई देवी मंदिर:

श्री यमाची देवीची मंदिर महाराष्ट्रात अनके ठिकाणी आहेत परंतु औंध मधील हे मंदिर मूळपीठ आहे. यमाई देवीचे देवस्थान औंध च्या दक्षिणेस असलेल्या डोंगराच्या माथ्यावर निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे. भक्त जणांवर चाललेला औंधसुराचा अन्याय दूर करण्यासाठी जोतीबा चालून आले परंतु त्यांची शक्ती या बलाढ्य राक्षाच्या शक्ती पुढे कमी पडू लागली तेव्हा जोतिबांनी श्री यमाई ची मदत घेऊन औंधसुराचा वध केला आणी जनतेस भयमुक्त केले.आणी तेह्वाच हा पौष पौर्णिमेचा दिवस भक्तगणांनी आनंद उत्सव म्हणून साजरा करण्यास सुरवात केली, आजही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

श्री मातेचे मंदिर औंधच्या दक्षिणेस असलेल्या डोंगरमाथ्या वर वसले आहे. मंदिरा सभोवतालचा परिसर हा निसर्गरम्य आहे. डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी पायऱ्या तसेच रस्ता उपलब्ध आहे. पायरी मार्गाने डोंगर चढताना सुरुवातीस देवीच्या पादुकांचे दर्शन होते आणी पुढे अंतर-अंतरावर दोन्ही बाजूंस संगमरवरात कोरलेली हत्ती, वाघ, सिंह, द्वारपाल यांची शिल्पे पहावयास मिळतात तसेच डोंगरात असलेले गणेश मंदिराचे दर्शन होते.मंदिराजवळ पोहचण्यआधी मध्ये पठारावर उजव्या बाजूस सुप्रसिद्ध भवानी संग्रहालय लागते. हे संग्रहालय श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी तयार केले असून यामध्ये अनेक चित्रकृती, शिल्पे आणी पुरातन वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. पुढे पायरी मार्गाने मंदिराकडे प्रस्थान करताना पुन्हा दोन्ही बाजूस गरुड व हनुमान यांची संगम्राव्रातील शिल्पे आणी पुढे नजरेस पडतो. भक्कम तटबंदी असलेल्या या किल्ल्यात श्री यमाई देवीचे मंदिर आहे. मंदिराच्या आवारात गणपती, दत्त, विष्णू, हनुमान व सरस्वती यांच्या मूर्ती व दत्त मंदिर आहे. तटबंदिस पूर्वेस एक खिडकी असून तिच्या दोन्ही बाजूस फिरते दगडी खांब येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेतात. खिडकीतून सूर्योदयाची किरणे थेट श्री यमाई देवीच्या मुखावर पडतात. मंदिराच्या गाभाऱ्यात श्री यमाई देवीची काळ्या पाषाणात घडविलेली आणी कमळात स्थित असलेली मूर्ती आहे. मुक्त झालेल्या औंधासुराने देवीकडे याचना करून तिच्या मंदिरासमोर स्थान प्राप्त केले. म्हणूनच देवीच्या मंदिरासमोर औंधासुराचेही मंदिर आहे.

यात्रा: पौष महिन्यात पौर्णिमेस देवीची यात्रा भरते. यात्रेस महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राबाहेरून देखील भक्त येतात.

श्री यमाई देवी मंदिर (मूळपीठ): औंध गावात देखील देवीचे भव्य मंदिर आहे. या मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून या मध्ये श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी आपल्या कुंचल्यातून चितारलेली पुरानातील घडामोडींची तैलचित्रे आहेत. मंदिराच्या अवरमध्ये असलेली दीपमाळ हि राज्यातील सर्वात उंच दीपमाळ आसे बोलले जाते. या मंदिराच्या शेजारीच राजवाडा आहे. राजवाड्यामध्ये देखील श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी याच्या कलाकृती आहेत.

यात्रा: पौष महिन्यात पौर्णिमेस देवीची यात्रा भरते. यात्रेस महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राबाहेरून देखील भक्त येतात.

मोकळाई मंदिर: औंध गावामध्ये असलेल्या तळया शेजारी असलेले हे मंदिर जुन्या काळातील दगडी बांधकामातील आहे. जेव्हा यमाई मातेने औंदासुराचा वाढ केला तेह्वा झालेल्या युद्ध जखमांचा दाह देवीस असह्य झाला तेह्वा मातेने येथील तळ्यात आपलेकेस मोकळे सोडून जलविहार केला आणि दाह शमविला, यामुळे या ठिकाणी देवीस मोकळाई म्हणून प्रसिद्धी लाभली. तळ्यातील पाणी पवित्र आहे आणि शरीरावरील रोग नाहीसे करतो आसे मानले जाते.


<< विभागाकड़े परत

 
 
© माणदेशी.कॉम सर्व हक्क सुरक्षित | स्वगृह | संपर्क करा | मत दया | मित्रांना सांगा
वेबसाईट बनविली आहे अमर ढेंबरे यांनी