आपला कौल
माणदेशी म्हणून तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटतो का?

 
View Poll Results | 3078 मते
म्हसवड

अंतर: दहिवडी पासून २५ किमी, पंढरपूर पासून ५७ किमी

कसे जाल: दहिवडी, पंढपूर, सातारा या ठिकाणांपासून बसेस उपलब्ध

म्हसवड विषयी माहिती

माणगंगा नदीच्या काठावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे गाव माण तालुक्याच्या पूर्वेस सातारा पंढरपूर मार्गावर आहे. हे गाव श्री नाथांचे निवासस्थान असून खूप जुन्या काळापासून प्रसिद्ध आहे.

सिद्धनाथ आणि श्री माता जोगेश्वरी देवी

सिद्धनाथ आणि श्री माता जोगेश्वरी देवी यांची स्थापना साधारणतः १० व्या शतकात झाल्याचे सांगण्यात येते. येथील मंदिर बांधणी आणि जीर्णोद्धार हा कराड तालुक्यातील डुबल घराण्याने केला असावा आशी नोंद पुरातन ताम्रपटात असल्याचे आढळून आले आहे. मंदिराची बांधणी आतिशय सुंदर असून येतील मध्यवर्ती भागात श्री नाथांच्या पादुका आहेत व तसेच जवळच नाथांची धुनी आहे. तसेच पादुका परिसरात शंभू महादेवाची पिंड व नंदी पहावयास मिळतो. नंदीच्या डाव्या बाजूस कन्नड भाषेतील पुरातन शिलालेख आहे. तसेच इकडे पिंडीच्या वरील बाजूस छोट्या मुर्त्या दिसतात त्यापैकी प्रथम मूर्ती गजाननाची आहे व पुढील ७ मूर्ती देवींच्या आहेत व ९वी मूर्ती सिद्ध्नाथांची आहे.

गाभाऱ्यात एकाच ठिकाणी श्री नाथांची आणि श्री देवी जोगेश्वरी यांची कपडयानी आणि मौल्यवान आलंकारानी सुशोभित मूर्ती बसवलेल्या आहे. उच्च स्थानावर स्थापित दोन्ही मूर्तींच्या समोर दगडी चौथरा आहे आणि मध्य भागी चौक आहे. मंदिराच्या दर्शिनी भागात मंडपामध्ये पाषाणात कोरलेली हत्तीची प्रचंड मूर्ती आहे. मंदिराच्या आवारात भक्तांनी बनविलेल्या उंच दीपमाला आहेत. मंदिरीच्या चारी बाजूस सज्जे आहेत. मंदिराच्या मुख्य शिखराची उंची शंभर फुटापेक्षा जास्त आहे. इथे आवारातील उंच दीपमाळा येणर्या भक्तांचे लक्ष हमखास वेधून घेतात तसेच यात्रेवेळी आणि तुळशीविवाह वेळी प्रज्वलित केलेल्या दीपमाळांचे दृश्य विलोभीनीय असते.

यात्रा

मार्गशिर्ष शु || १ या दिवशी श्री सिद्धनाथांची यात्रा असते, या दिवशी नाथांची मिरवणूक मोठ्या रथातून उत्साहात आणि जल्लोषात निघते. तसेच या आधी नवरात्र उत्सवात कार्तिक शु || १ ते कार्तिक शु || १२ पर्यंत श्री सिद्धनाथ व श्री देवी जोगेश्वरी यांच्या लग्नाचा सोहळा होत असतो. नाथांच्या समोर घटस्थापना होत असते. हे सर्व विधी उरकणेस किमान सकाळपासून बारा ते दोन वाजतात. त्यावेळेपासून नवरात्रीस सुरवात होत. दिवाळीच्या पाडव्याला हळदी समारंभ होऊन श्री सिद्धनाथ श्री देवी जोगेश्वरीस अभ्यंग स्नान घातले जाते. आणि मूर्ती लोखंडी मंडपात आणल्या जातात. येथे पोशाख व मौल्यवान अलंकार अंगावर चढवून चौरंगावर विराजमान करून त्यांच्यावर सुमनांचा वर्षाव करतात. गावातील सालकरी पुजारी आणि सुहासनी आणि इतर महिला हा समारंभ पार पडतात.


<< विभागाकड़े परत

 
 
© माणदेशी.कॉम सर्व हक्क सुरक्षित | स्वगृह | संपर्क करा | मत दया | मित्रांना सांगा
वेबसाईट बनविली आहे अमर ढेंबरे यांनी