13 crore tree planting in Mandesh
 

मित्रहो,

मेडीहार्ट अँड रीव्होल्युशनरी रोटरी कम्युन (मार्क) या पुण्यातील संस्थेतर्फे अनेक तीर्थक्षेत्रे असलेल्या परंतु सतत दुष्काळाशी झुंजणाऱ्या माण-खटाव तालुक्यात या वर्षभरात १३ कोटी झाडे लाऊन त्यांची देखभाल करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात माण-खटाव तालुक्यातील सर्व रस्त्यांवर, दुसऱ्या टप्प्यात इच्छुक शेतकऱ्यांच्या शेतांच्या बांधावर आणि तिसऱ्या टप्प्यात गायरानावर झाडे लावून त्यांची देखभाल करण्याचा संकल्प आहे. या सेवाभावी कार्यास आपले सहकार्य लाभल्यास हे महान कार्य अनुकुलरित्या पूर्णत्वास जाईल अशी आमचीच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्राची श्रद्धा आहे. आपल्या सहकार्याने संस्थेचे हे कार्य नि:शंक ध्येयाप्रत पोहोचेल.

हे कार्य व्हावे ही तर श्रींची इच्छा

श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन, सीतेचे वास्तव्य आणि वीर हनुमानासह अश्वमेधाला अडविणाऱ्या कुश-लवाचे जन्मस्थळ असलेल्या, शिवशाहीत निधड्या वीरांना कुशीत विसावा देणाऱ्या, समर्थ रामदास स्वामी, श्री सेवागिरी महाराज, श्री गोंदवलेकर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज अशा थोर विभूतींनी अजरामर केलेल्या याच माण-खटाव तालुक्याच्या परिसराला गेली कित्येक दशके दुष्काळ नावाचा राक्षस होरपळवतोय. त्याच्याशी लढण्यासाठी आणि त्याच्या समूळ नाशासाठी आमच्याबरोबर या हरितक्रांतीच्या लढ्यात सामील व्हा! भारतमातेची हि हाक ऐकण्यासाठी आपण सारे मिळून एक होऊया....

मग काय विचार केलात? एखादा सुट्टीचा रविवार आमच्यासोबत घालवायला येणार ना?

आपण सर्वांच्या सहभागाने हे महान कार्य सिद्धीस श्रीराम समर्थ आहेतच..ही तुम्ही-आम्ही केलेली चळवळ आहे. शिवशाहीच्या इतिहासात मानाचा शिरपेच खोवान्यासाठी वीरानो एकत्र या. महाराष्ट्रातील एकजुटीची ताकद पुन्हा जगाला दाखवून देऊयात. चला हि वेळ आहे खडबडून जागे होण्याची, या एकजुटीत सामील होण्याची. सर्व सेवाभावी संस्थांचे या मानवता कार्यात हार्दिक स्वागत.

आमच्यासोबत चला एक दिवस या मातीशी हितगुज करायला.
Do you know this?
   
   
Copyright © Mandeshi.com 2012